*स्पोकन इंग्लिश अँपचे शिक्षणाची वारी मध्ये मा. शिक्षण सचिव श्री नंदकुमार साहेबांच्या हस्ते लाँन्चिंच व लोकार्पण....*

प्रादेशिक विद्या प्राधिकरण व आंग्लभाषा केंद्र,औरंगाबाद करीता औरंगाबाद जिल्ह्यातील १२ तंत्रस्नेही शिक्षकांनी स्पोकन इंग्लिश इंटरअँक्टीव अँप बनविले आहे. या अँपचे लाँन्चिंग व लोकार्पण राज्याचे शिक्षण प्रधान सचिव श्री.नंदकुमार यांच्या हस्ते आज दि.१८ जानेवारी रोजी करण्यात आले.यावेळी मा. श्रीमती प्राची साठे, मा.श्रीमती सुवर्णा खरात,मा.संचालक श्री.सुभाष कांबळे, मा.श्री.आर.एस.मोगल,मा.श्री.एम.के.देशमुख, मा.श्री. पाटील, केंब्रीज विद्यापीठाच्या श्रीमती बँनेट आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची इंग्रजी अधिक दर्जेदार करण्यासाठी आजुबाजुच्या वातावरणात बोलण्यासाठीचे आवश्यक संवाद चित्र तसेच चित्रासोबत योग्य उच्चारासह टचवर उपलब्ध झाले आहेत हे या अँपचे वैशिष्ट्य आहे. या अँपची संकल्पना संचालक श्री.सुभाष कांबळे यांची असून प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे मा.श्री.उज्ज्वल करवंदे यांचे सहकार्य लाभले आहे.

या अँपच्या निर्मितीमध्ये जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक विकास बोचरे,दिनेश म्हस्के,महेश लबडे,सचिन पोलास,भारती फुलारे,पुजा ठोके, नंदा श्रीपत,सुषमा खरे,नरेश पेद्दी,संदीप खंडागळे,संजय बिरारे,नितीन पवार व प्रमोद गंगावणे सहभागी होते.

सदरील अँप लवकरच प्ले स्टोअर वर उपलब्ध होईल. तोपर्यंत आपण या लिंकवर क्लिक करुन अँप डाउनलोड करू शकतो.

Click here to Download the app

Contact Details

  PVP
  Call: 0240 - 2334448
  FAX: 0240 - 2334365
  E-Mail: anglabhasha@gmail.com

  Office Address:
  Padampura, Station road, near Deogiri College Aurangabad PIN: 431001